महाराष्ट्र संघाला ज्युनिअर राष्ट्रीय चॅम्पियनशिप !

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विलेपार्लेच्या जिमनॅस्टपटूंचा पराक्रम
Edited by: रुपेश पाटील
Published on: January 11, 2023 19:35 PM
views 256  views

मुंबई :  नुकत्याच केरळ येथील त्रिवेंद्रम शहरात  ज्युनिअर जिमनॅस्टिकच्या स्पर्धा पार पडल्या. यात १६ राज्याच्या सुमारे ३०० स्पर्धकांनी भाग घेतला होता. महाराष्ट्राच्या ज्युनिअर संघात निशांत करंदीकर, सार्थक राऊळ, अनुष्का पाटील व निती दोशी या सर्वांनी  महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करत महाराष्ट्राला पहिल्यांदाच पुरुष अणि महिला दोन्ही गटात राष्ट्रीय स्तरावर चॅम्पियनशिप मिळवून सुवर्ण पदक कमवले.

या स्पर्धेत सार्थक राऊळ याने वैयक्तिक दुसरा क्रमांकसुद्धा पटकावला. यामुळेच फेब्रुवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यात मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या खेलो इंडिया युथ स्पर्धेसाठी या चौघांची निवड झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती (रजि.) संचलित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू, सचिव डॉ. मोहन राणे,  जिम्नॅस्टिक्स प्रमुख नीलम बाबर-देसाई, सर्व विश्वस्त आणि पुरुष प्रशिक्षक शुभम गिरी तसेच महिला प्रशिक्षक विशाल कटकदौंड यांचे मोलाचे सहकार्य या खेळाडूंना मिळत आहे.