ललित हरमलकर सगल दुसऱ्या वर्षी सिंधुदुर्ग केसरीचा मानकरी !

पै. संतोष दाभोलकर ठरला उपकेसरी
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 04, 2022 21:35 PM
views 274  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा कुस्ती संघटनेच्या प्रौढगट निवड चाचणी कुस्ती स्पर्धा पाट येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन एस के पाटील शिक्षण प्रसारक मंडळ; पाटचे माजी कार्याध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्हा कुस्ती संघटनेचे उपाध्यक्ष  आर. आर. रेडकर याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पाट हायस्कूलचे पर्यवेक्षक श्री. हंजणकर, संघटनेचे सचिव दाजी रेडकर, सदस्य प्रविण वेर्णैकर, शेखर तेली, विशाल ठाकुर, चारुहास वेंगुर्लेकर, रुपेश कोनकर, राजेश गोवेकर उपस्थित होते.

या निवड चाचणी स्पर्धसाठी जागा उपल्बध करुन दिल्याबद्दल पाट हायस्कूल  आभार संघटनेकडून मानण्यात आले. 

निवड चाचणी स्पर्धचा निकाल पुढीलप्रमाणे : 

 57 किलो गादी विभाग बूधाजी हरमलकर सावंतवाडी,

 61 किलो गादी विभाग दशरथ गोडयाळकर सावंतवाडी,

 65 किलो गादी विभाग नागेश सावंत शिवडाव कणकवली,

70 किलो गादी विभाग संकेत माळी सावंतवाडी,

74 किलो गादी विभाग हर्षद मौर्ज वेंगुर्ला,

माती विभाग : नित्यानंद वैगूर्लेकर वेंगुर्ला,

79 किलो गादी विभाग शुभम सावंत शिवडाव कणकवली,

माती विभाग : गणेश राऊळ सावंतवाडी,ललित हरमलकर सगल दुसऱ्या वर्षी सिंधुदुर्ग केसरी चा मानकरी

सिंधुदुर्ग केसरी पै ललित हरमलकर सावंतवाडी तर उपकेसरी पै संतोष दाभोलकर 

संघटनेचे सचिव दाजी रेडकर यांनी सर्व विजयी व सहभागी झालेल्या कुस्तीगीराचे स्वागत करुन पुढील राज्यस्तरीय अधिवेशन (स्पर्धेसाठी) शुभेच्छा दिल्या.