
संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील नायरी गावाचा उदयोन्मुख क्रिकेटपटू झैद नफील पाटणकर याची निवड इंग्लंड दौऱ्यासाठी होणाऱ्या मुंबईच्या युवा क्रिकेट संघात करण्यात आली आहे. ही बातमी नायरी गावासह संपूर्ण कोकणासाठी अभिमानास्पद आहे.
या दौऱ्यात मुंबईचा संघ ५ दोन दिवसीय सामने आणि ४ एकदिवसीय सामने खेळणार असून, स्पर्धा अत्यंत दर्जेदार असून त्यातून युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुभव मिळणार आहे.
झैद पाटणकर याने याआधी अनेक स्थानिक आणि जिल्हास्तरीय सामन्यांमध्ये आपली चमक दाखवत इतरांचे लक्ष वेधले होते. झैद चे आजोबा ही एक चांगले क्रिकेटपटू होते.