'एसपीके'च्या मैदानावर कोकण विभागीय आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा

राजेसाहेब खेम सावंत भोंसले यांच्या हस्ते उद्घाटन
Edited by: विनायक गांवस
Published on: January 12, 2023 09:10 AM
views 156  views

सावंतवाडी : मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोकण विभागीय आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने सावंतवाडी येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब  खेम सावंत भोंसले यांच्या हस्ते करण्यात आले .

याप्रसंगी संस्थेचे सहसंचालक अॅड. शामराव सावंत , सदस्य डॉ. सतीश सावंत, श्री जयप्रकाश सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल , क्रीडा संचालक प्रा. सीए नाईक, आय क्यू एसी समन्वयक डॉ. बी एन हिरामणी ,प्रा.आर बी शिंत्रे, डॉ. डी जी बोर्डे , समिती सदस्य डॉ. जी एस मर्गज, डाॅ.एस एम बुवा, प्रा. व्ही पी सोनाळकर, प्रा व्ही जी बर्वे ,डॉ. एस ए देशमुख, डॉ.संदीप पाटील ,. बॅ.खर्डैकर महाविद्यालयाचे प्रा. गावडे ,एस एच केळकर महाविद्यालयाचे  प्रा.राऊत तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या क्रिकेट स्पर्धेसाठी पंच म्हणून एमसीए सर्टिफिकेट  होल्डर मंगेश नार्वेकर,  श्री संदीप रुद्रे व स्कोरर म्हणून अमोल केसरकर हे काम पाहणार आहेत, 

       याप्रसंगी कु. प्रणव सावंत या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची हँडबॉल स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठातून निवड झाली त्या विद्यार्थ्यांने जयपूर येथे झालेल्या आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळ केला या  विद्यार्थ्पाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत  करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गणेश  मर्गज यांनी केले. 

स्पर्धेचा आज पहिला दिवस यामध्ये  एस एच केळकर कॉलेज देवगड व बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर कॉलेज वेंगुर्ला या दोन संघांमध्ये पहिला सामना खेळवण्यात आला . या सामन्यामध्ये खर्डेकर कॉलेजने 20 षटकांमध्ये सात गडी गमावून 154 धावा केल्या यामध्ये एलिस्टर फर्नांडिस याने 54 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या एस एच केळकर काॅलेज  संघाने सर्व बाद 121 धावा केल्या .बॅ. खर्डेकर कॉलेजचा संघ यामध्ये विजेता ठरला

दुसऱ्या मॅच मध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी व  संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ या दोन संघांमध्ये  सामना खेळवण्यात आला. यामध्ये प्रथम फलंदाजी करत  17 षटकात कुडाळ कॉलेजने सर्व बाद ७४ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या श्री पंचम खेमराज महाविद्यालय संघाने दोन  बाद 78 धावा करून यामध्ये विजय मिळवला. रोस्टन फर्नांडिस यांने 27 धावा तर दत्ताराम कोणाळकर याने 23 धावा फटकावल्या.दोन्ही विजेत्या संघाचे अभिनंदन करण्यात आले.