विभागीय कॅरम स्पर्धेत स्वरा कदम - ओमकार वडर प्रथम

Edited by: विनायक गांवस
Published on: October 31, 2024 17:32 PM
views 123  views

सावंतवाडी : क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद द्वारा रत्नागिरी येथे सोमवारी घेण्यात आलेल्या विभागीय कॅरम स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलींच्या गटात रत्नागिरी येथील रा.भा. शिर्के विद्यालयची स्वरा मिलिंद कदम, तर मुलांच्या गटात कोल्हापूर माझी शाळा भोसलेवाडीचा ओमकार राजू वडर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. आता राज्यस्तरीय स्पर्धा येत्या १२ ते १४ नोव्हेंबर रोजी आंबोली सैनिक स्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे.

१४ वर्षाखालील मुलींच्या गटात प्रथम स्वरा मिलिंद कदम, द्वितीय रत्नागिरी रा.भा. शिर्के स्कूल ची स्वरा सुरेश मोहिरे, तिसरी कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडीची साक्षी रमेश रामदूरकर ,चौथी सातारा वाई येथील जान्हवी बळीराम निशाद, पाचवी रत्नागिरी रा.भा. शिर्के स्कूल ची सृष्टी पंकज चवंडे, सहावी मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी ची आस्था अभिमन्यू लोंढे, सातवी रा.भा. शिर्के स्कूल रत्नागिरीची  श्रावस्ती मंगेश कांबळे व आठवी सिंधुदुर्ग कनेडी माध्यमिक विद्यालयाची मीरा मकरंद आपटे यांनी क्रमांक पटकावले. 

१४ वर्षाखालील मुलांच्या गटात कोल्हापूरचा प्रथम ओमकार राजू वडर, द्वितीय जैतापूर न्यू इंग्लिश स्कूलचा सर्वेश गणेश अमरे, तृतीय जैतापूर न्यू इंग्लिश स्कूल चा वेदांत राजेश करगुटकर ,चौथा कोल्हापूर सावित्रीबाई फुले विद्यालयाचा निखिल लक्ष्मण पाटील, पाचवा  गुहागर श्रीदेव गोपाळ कृष्ण विद्यालयाचा स्मित राजेंद्र कदम, सहावा सिंधुदुर्ग नॅशनल इंग्लिश स्कूल नडगिवे चा आरफात चौगुले, सातवा सातारा सेंट पाॅल स्कूल सोहम सचिन राजे व आठवा सांगली इम्यानुअल इंग्लिश स्कूल चा अर्णव अभिजीत पाटील यांनी क्रमांक पटकावले.

१७ वर्षाखालील गटात प्रथम कोल्हापूर विमला गोयंका स्कूलची ईश्वरी धैर्यशील पाटील, द्वितीय देवगड उमा मिलिंद पवार हायस्कूलची पूर्वा दीपक कोतकर, तृतीय रत्नागिरी गोदुताई जांभेकर विद्यालयाची सेजल सुभाष जाधव, चौथी सिंधुदुर्ग कनेडी माध्यमिक विद्यालयाची श्रेया राजेंद्र महाडिक, पाचवी सातारा न्यू इंग्लिश स्कूल कण्हेर ची तनिष्का दिलीप कडव, सहावी रत्नागिरी सेक्रेट हार्ट काॅन्व्हेंटची खुशी नरेंद्र आयरे ,सातवी सातारा न्यू इंग्लिश स्कूल कण्हेर ची ईश्वरी नितीन शिंदे व आठवी सांगली कुपवाड अकूज इंग्लिश स्कूल ची  सानिका बिरुदेव बुदनूर यांनी क्रमांक पटकावला.

१७ वर्षाखालील मुलांच्या गटात प्रथम रत्नागिरी रा.भा. शिर्के हायस्कूल चा ओम दिनेश पारकर, द्वितीय सावंतवाडी मिलाग्रिस हायस्कूलचा अमूल्य अरुण घाडी, तृतीय सांगली इम्यानुअल इंग्लिश स्कूलचा प्रथमेश दिलीप हद्दीमनी, चौथा इचलकरंजी साई इंग्लिश स्कूलचा मोहम्मदतझिम अस्लम शेख, पाचवा राणी पार्वतीबाई हायस्कूल सावंतवाडी चा स्वप्निल मंगेश लाखे, सहावा कोल्हापूर न्यू इंग्लिश स्कूल कसबाचा वेदांत विजय पाटील, सातवा कोल्हापूर न्यू इंग्लिश कसबा चा अनुज रामचंद्र पाटील, आठवा सावंतवाडी मिलाग्रिस हायस्कूल चा यशराज महेश गवंडे क्रमांक पटकावला.

१९ वर्षाखालील मुलींमध्ये प्रथम राणी हायस्कूल सावंतवाडीची प्रथम प्रणिता नथुराम आयरे, द्वितीय रत्नागिरी अभ्यंकर कुलकर्णी महाविद्यालयाची श्रावणी विजय कोलगे, तृतीय सातारा श्री भवानी विद्यामंदिर ची श्रावणी रमेश साबळे, चौथी रत्नागिरी अभ्यंकर कुलकर्णी विद्यालयाची मुक्ता अविनाश पेंडसे , पाचवी रत्नागिरी अभ्यंकर कुलकर्णी महाविद्यालयाची समीरा सचिन शिंदे, सहावी सांगली इस्लामपूर सुशाताई पाटील स्कूलची दिपाली कैलास माळी, सातवी सांगली यशवंत हायस्कूलची तन्वी गजानन पाटील,आठवी सांगली कन्या शाळा शिराळाची वेदिका विनायक विंचू यांनी क्रमांक पटवला पटकावला आहे.

तर १९ वर्षाखालील मुलांमध्ये प्रथम सावंतवाडी मिलाग्रिस हायस्कूल विद्यालयाचा राम प्रकाश फाले, द्वितीय सांगली शिराळा श्री शिव छत्रपती विद्यालयाचा  संस्कार सुनील कांबळे, तृतीय सातारा मालोजीराजे शेती विद्यालयाचा ओंकार रामचंद्र रामदास शिंदे, चौथा सांगली शिराळा न्यू इंग्लिश स्कूलचा आजान समीर मुजावर, पाचवा सिंधुदुर्ग कासार्डे माध्यमिक विद्यालयाचा वेदांत विनायक वायंगणकर , सहावा सांगली श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेजचा अभिषेक सुनील केंचे , सातवा रत्नागिरी अभ्यंकर कुलकर्णी विद्यालयाचा आर्यन संदीप संसारे, आठवा कोल्हापूर विवेकानंद कॉलेजचा पृथ्वीराज दीपक धोंडे यांनी क्रमांक पटकावला.

 रत्नागिरी येथे झालेल्या विभागीय कॅरम स्पर्धेचे प्रमुख पंच मंदार दळवी व सागर कुलकर्णी, स्पर्धाप्रमुख मिलिंद साप्ते तसेच क्रिडा मार्गदर्शक गणेश खैरमोडे, क्रिडा अधिकारी अक्षय मारकड, सचिन मांडवकर, गणेश जगताप आदींनी स्पर्धा यशस्वी केली.