
सावंतवाडी : श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा संकुल, सातारा येथे 17 वर्षाखालील मुलांच्या विभागीय शालेय क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये मिलाग्रीस हायस्कूलने घवघवीत यश संपादन केले. विभाग स्तरावर मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. मिलाग्रीस हायस्कूलच्या क्रिकेटपटूंनी कोल्हापूर व इचलकरंजी अशा दोन संघांवर मात करून अंतिम फेरीत धडक मारली. या सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी विशेष कौतुक केले व संघाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पर्यवेक्षिका टीचर संध्या मुणगेकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग यांनी सुद्धा या क्रिकेट संघाचे अभिनंदन केले.