चिपळूण : चिपळूण तालुक्यातील सावडे येथील अली पब्लिक स्कूल सावर्डाया इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या क्रीडा स्पर्धा दोन दिवसात उत्साहात पार पडल्या. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सीड्स फाउंडेशन मुंबई या संस्थेचे उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते जनाब शहाबुद्दीन गुलाम मोहीद दिन सुर्वे तर इतर पाहुणे म्हणून कोशिश फाउंडेशन चिपळूणचे अध्यक्ष जनाब मुजाहिद मेहर उपस्थित होते.
क्रीडा स्पर्धेची सुरुवात विद्यार्थ्याच्या कुराण पठणाने करण्यात आले. इयत्ता सातवी व आठवीचे विद्यार्थिनी फातिमा चिकटे, खतिजा माखजनकर, आईशा बोंबल व इतर विद्यार्थिनी नाथ सादर केली. शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा चिकटे यांनी आपल्या प्रस्ताविकात शाळेबद्दल माहिती दिली. कमिटी सदस्य अब्दुल कादिर भो बल मुराद भाई खल पे इस्लामुद्दीन भाई बोंबल नजीर भाई चिलवान सदस्यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा आदर व स्वागत व सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे चिपळूण येथील जनाब शाबुद्दीन सुर्वे यांनी आपल्या मनोगतामध्ये मुलांना मोबाईलचे दुरुपयोग व वेळेचे महत्व व खेळाचे महत्व याविषयी सखोल मार्गदर्शन केले. कोशिश फाउंडेशनचे जनक मुजाहिद मिळाल्याने ही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास शाळेचे दिन्यात शिक्षक मौलाना सोबत नाखवा यांनी सुरेख सूत्रसंचालन केले. मुख्याधिका सीमा मॅडम यांनी प्रमुख पाहुणे आणि शाळेला गोदरेज कपाट भेट दिल्याचे जाहीर केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले. कार्यक्रमाला स्कूल कमिटी चेअरमन नजीर चिलवान, सदस्य अब्दुल कादिर भोंबल, इस्लामुद्दीन भोंबाल मुराद खलप्पे, अमीर मंसूरी, फिरोज मुल्लाजी व इतर प्रमुख उपस्थित होते. खो-खोच्या मैदानाच्या उद्घाटनाने स्पर्धेची खरी सुरुवात करण्यात आली. दिवसभरात विद्यार्थ्याने आपल्या नैपुण्यपूर्ण खेळाने प्रभाव दाखविला.
या दोन दिवसाच्या क्रीडा स्पर्धेसाठी शाळेतील सर्व शिक्षिका तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक व ग्रामस्थ यांचे बहुमोल सहकार्य लाभले.