आंबोली सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचं नेत्रदीपक यश

Edited by: विनायक गांवस
Published on: September 23, 2024 12:48 PM
views 121  views

सावंतवाडी : महाराष्ट्र जुदो असोसिएशन महाराष्ट्र, आयोजित 51 वी महाराष्ट्र जुनिअर आणि कॅडेट राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धा कासार्डा इथं पार पडली. या स्पर्धेत सैनिक स्कूल, आंबोलीच्या विद्यार्थ्यांना नेत्र दिपक यश संपन्न झाले. यातील सहा विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय निवड झाली आहे.  

या यशस्वी खेळाडूंमध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी कॅ.गणेश चव्हाण, कॅ. समर्थ लाडेगावकर, कॅ. करण यादव, कॅ. ईशान शिंदे, कॅ.आर्यन कोरगावकर आणि कॅ.सिद्धार्थ श्याम शाशमल ठरले आहेत. हे सर्व विजयी खेळाडू दि.4, 5, व 6 तारखेला महाराष्ट्र जुदा असोसिएशन मार्फत आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा रत्नागिरी मधील डेरवण येथे होणार आहे. तर द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत कॅ. यश धुरी आणि कॅ. मलिक मॅथ्यू राॅड्रिक्स आणि तृतीय क्रमांक कॅ. देवांग बेहेकर याचा आला आहे.

 या सर्व यशस्वी खेळांडूंचे आणि त्यांचे प्रशिक्षक दिनेश जाधव यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष सुनील राऊळ, संचालक जाॅय डॉन्टस, कार्यालयीन सचिव दीपक राऊळ व सर्व संचालक मंडळ आणि प्राचार्य एन.डी. गावडे यांनी केले. त्यांच्या राज्यस्तरीय खेळासाठी अनंत शुभेच्छा दिल्यात.