नवी दिल्ली : सचिन तेंडूलकरची भविष्यवाणी खरी ठरली. विराट कोहली माझा विक्रम मोडेल, असं भाकित सचिन तेंडूलकरने केलं होतं. अशातच आता विराट कोहलीने सचिन तेंडूलकरच्या महान विक्रमाची बरोबरी केली आहे. वनडे क्रिकेटमध्ये सचिन तेंडूलकरच्या नावावर सर्वाधिक 49 शतकांचा विक्रम होता. आता विराट कोहलीने 49 शतकं पूर्ण केली आहेत. योगायोग म्हणजे विराटने त्याच्या बर्थडे दिवशी आपल्या करियरमधील 49 वं शतक पूर्ण केलंय. त्यामुळे आता असा किंग होणे नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
विराटचं दमदार वनडे करियर
विराट कोहलीने आत्तापर्यंत 289 वनडे सामने खेळले असून त्यात त्याने 58.43 च्या सरासरीने आणि 93.55 च्या स्टाईक रेटने धावा खेचल्या आहेत. 1275 फोर आणि 149 सिक्स असा भन्नाट रेकॉर्ड विराटच्या नावावर राहिला आहे.