
सिंधुदुर्गनगरी : येथील क्रीडा संकुलात नुकतीच जिल्हास्तरीय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा पार पडली.यामध्ये खेमराज बांदाच्या चार विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केलं. खेमराजच्या चार विद्यार्थ्यांना दोन सुवर्णपदक, दोन रौप्यपदक पटकावत घवघवीत यश संपादन केलं. यामध्ये प्रेरणा भोसले, दिक्षा वरक यांनी सुवर्ण तर लतीक्षा शेटकर व साहिल कुबडे यांनी रौप्यपदक पटकवले.
धी बांदा नवभारत संचलित खेमराज मोरियल इंग्लिश स्कुल व व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदाचे मुख्याध्यापक नंदू नाईक यांनी या यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थाध्यक्ष,संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलं आहे.