वैभववाडी : ग्रामसेवक क्रीडा मंडळ उंबर्डे यांच्यावतीने आयोजित केलेल्या पंधराव्या राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेत खली पंजाब संघ विजेता ठरला तर इस्त्याक मालेगाव संघ उपविजेता ठरला. अटीतटीच्या लढतीत पंजाब संघाने मालेगाव वर मात करीत पंधराव्या राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
उंबर्डे येथील ग्रामसेवा क्रीडा म़डळाच्यावतीने गेली १४ वर्ष राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी ही स्पर्धा शहरात झाली. या स्पर्धेकरिता देशभरातून १६संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेतील अंतिम सामना खली पंजाबी विरुद्ध मालेगाव यांच्यात झाला. यामध्ये खली संघ विजेता ठरला. विजेत्या पंजाब संघाला रोख रुपये १५हजार व उपविजेत्या इत्याक मालेगाव संघाला दहा हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेत तिसरा क्रमांक राजुरी सांगली, चौथा क्रमांक आयएलसी मालेगाव, पाचवा क्रमांक सोलापूर, सहावा क्रमांक क्रांती साखर कारखाना कुंडल सांगली, सातवा क्रमांक टेंभुर्णी सोलापूर, आठवा क्रमांक सातारा यांनी प्राप्त केला.या संघांना रोख रक्कम व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच वैयक्तिक बक्षीसांमध्ये उत्कृष्ट शूटर इस्त्याक (मालेगाव), उत्कृष्ट नेटमन इम्तियाज (मालेगाव) उत्कृष्ट लिफ्ट कुणाल (पंजाब संघ), आदर्श संघ- क्रांती साखर कारखाना कुंडल सांगली यांनी बक्षीसे मिळवली.
स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा बँकेचे संचालक दिलीप रावराणे, माजी सभापती अरविंद रावराणे, भाजपा तालुकाध्यक्ष नासिर काझी यांच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्षा नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.रात्री उशिरा स्पर्धा संपली. विजेत्या संघांना रोख रक्कम व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी ग्रामसेवा क्रीडा मंडळाचे अध्यक्ष शेरपुद्दीनन बोबडे, सिंधुदुर्ग शूटिंग बॉल असोसिएशनचे अध्यक्ष श्री संकपाळ, सुभाष तळवडेकर, शरद नारकर ,पापा मौलवी शैलेंद्रकुमार परब, गुलाबराव चव्हाण, हुसेन लांजेकर,संतोष टक्के, ॲड महेश रावराणे, उत्तम सुतार, साबीर मौलवी ,विजय केळकर, शहाबुद्दीन नाचरे नितीन महाडिक, संजय महाडिक, अलिबा बोथरे, हाजी पाटणकर, प्रताप सुतार आदी उपस्थित होते.