केशर निर्गुण राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत उपविजेती...!

Edited by:
Published on: December 05, 2023 15:28 PM
views 249  views

सावंतवाडी : देवरुख, रत्नागिरी येथे १४ ते १६ नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने रत्नागिरी डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशन आयोजित आमदार शेखर निकम पुरस्कृत वरिष्ठ राज्यस्तरीय कॅरम मानांकन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत राज्यभरातून सुमारे १४० खेळाडू सहभागी झाले होते.

सावंतवाडी येथील ज्युनिअर गटात तृतीय राष्ट्रीय मानांकन असलेल्या केशर राजेश निर्गुण हीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करताना उपान्त्य फेरीत महाराष्ट्राच्या मानांकित प्राजक्ता नारायणकरचा सरळ सेटमधे पराभव केला. अंतिम फेरीत रत्नागिरीच्या आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सुवर्णपदक विजेत्या आकांक्षा कदम हिने मात्र केशर निर्गुणवर मात केली. त्यामुळे केशरला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. या विजयासह महाराष्ट्र राज्य मानांकनात ७ गुणांसह राष्ट्रीय स्पर्धेमधे केशरने आपली दावेदारी बळकट केली आहे.सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांर्नी व खेळाडूंनी केशरचे अभिनंदन केले.