
कणकवली : केवळ फोंडाघाटच्याच नव्हे तर सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जावा असा क्षण म्हणजे न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट या प्रशालेचे ई.9 मध्यें शिकणारी कु. मनस्या फाले हिने ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प सर्व्हिस शूटिंग (नेमबाजी)स्पर्धेत अचूक लक्षवेध करत दिल्ली मध्यें राष्ट्रिय पातळीवर सुवर्णपदक मिळवून पुन्हा एकदा आपले कार्य कर्तृत्व सिध्द केले आहे. या अगोदर तीने अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प सर्व्हिस शूटिंग (नेमबाजी) स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले होते.
कु. मनस्या ही सर्वसाधारण मागास वर्गीय कुटुंबातील असून ती अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत आहे. तिच्या घरी म्हणावी तेवढी शैक्षणिक पार्श्वभूमी नसतानाही केवळ आई वडिलांच्या पाठबळावर तसेच 58 एन. सी. सी.बटालियन प्रमुख कमांडो ऑफिसर दिनेश शर्मा, ए ओ कर्नल तनुज मंडलिक,सुभेदार मेजर कुलदीप सूधाकर व या प्रशालेच्या एन. सी. सी.ऑफिसर सौ. आर्या भोगले, एम. जी. लाड, पोफळे,प्रशालेचे मुख्याध्यापक प्रसाद पारकर व या प्रशालेच्या संचालक मंडळ या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली व प्रोत्साहनामुळे तीने आजवरची सुवर्ण प्रगती साधली आहे. तीने एवढ्या लहान वयात अत्यंत मेहनत व चिकाटीच्या जोरावर आपल्या कलेचा झेंडा राष्ट्रीय स्तरावर रोवला आहे. याबाबत तीचे फोंडाघाट पंचक्रोशीतून कौतुक करण्यात येत आहे व तीचा भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत. सध्या ती दिल्ली येथे असून तिच्या आगमनाची प्रतीक्षा फोंडाघाट वासिय आतुरतेने करत आहेत