
कणकवली : जयगणेश इंग्लिश मिडीयम स्कूल मालवण येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि जुनियर कॉलेज वरवडे या प्रशालेने नेत्रदीपक यश मिळवले आहे. या स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलींच्या गटात सिद्धी हरिओम प्रसाद हिने प्रथम, शरिद्धी हरिओम प्रसाद हिने दुसरा, तुबा अंजुम शेख हिने चौथा क्रमांक तर शिफा बुलंद पटेल हिने सहावा क्रमांक मिळवला. १७ वर्षाखालील मुलांच्या गटात किशन देसाई याने दुसरा, आर्यन बाणे याने तिसरा, गणेश वातोडे याने पाचवा तर शुभम तांबे याने सहावा क्रमांक मिळवला.
सर्व विजेत्यांची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष मोहन सावंत, कार्याध्यक्ष बुलंद पटेल, सचिव प्रा. हरिभाऊ भिसे, सहसचिव प्रा. निलेश महिंद्रकर, खजिनदार शीतल सावंत, सल्लागार डी. पी. तानावडे, मुख्याध्यापिका अर्चना देसाई आदींनी अभिनंदन केले आहे. सर्व यशस्वी विध्यार्थ्यांना प्रशाला क्रीडा शिक्षक योगेश सामंत सर, वासुदेव दळवी सर, जिष्णा नायर मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.