सावंतवाडी : सावंतवाडी एज्यूकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडीच्या खेळाडू मुलींनी शालेय कॅरम स्पर्धेमध्ये तालुकास्तर, जिल्हास्तर व विभागस्तर स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामुळे त्यांची आता राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे.
दिनांक २१ ते २३ डिसेंबर २०२२ रोजी रत्नागिरी जिल्हा क्रीडा संकुल येथे संपन्न झालेल्या विभागीय स्पर्धेमध्ये प्रशालेचे प्रतिनिधित्व करत प्रणिता नथुराम आयरे (वयोगट - १७) कॅरम खेळात द्वितीय क्रमांक मिळविला तर १४ वर्षे वयोगटातून साक्षी रमेश रामदुरकर हिने विभागस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी मान मिळवला.
दिनांक १४ ते १६ जानेवारी २०२३ रोजी चिपळूण (डेरवण) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी या दोघीही खेळाडू विद्यार्थिनींची निवड झालेली आहे. या दोन्ही खेळाडू विद्यार्थिनींना प्रशालेचे क्रीडा शिक्षक नारायण केसरकर यांचे सहकार्य लाभले. तसेच कार्यालयीन कामकाजासाठी प्रशालेचे पी. बी. बागुल, गझल शेख यांची विशेष मदत लाभली.
या सर्व खेळाडू विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष शैलेश पै, सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर, सर्व संचालक मंडळ, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद गोठोस्कर, मुख्याध्यापक एन. पी. मानकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग यांचेकडून अभिनंदन करण्यात आले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.