
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धा कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात पार पडली. यात कळसुली इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले.
१९ वर्षांखालील मुलींचा गट : प्रथम- रसिका नंदन गावकर (खेळ प्रकार- फॉईल ), द्वितीय-मानसी सुनील मेस्त्री. (खेळ प्रकार- सेबर), आर्या आनंद राणे (खेळ प्रकार-ईपी), १९ वर्षांखालील मुलांचा गटात : प्रथम-स्मीत सुहास कदम ( खेळ प्रकार -फॉईल), प्रथम-आर्यन अनंत जाधव ( खेळ प्रकार- ईपी ), द्वितीय-हर्षल ज्ञानेश्वर शिरसाट (खेळ प्रकार -ईपी ), १७ वर्षांखालील मुलांचा गट : तृतीय-प्रवीण प्रमोद घाडीगावकर (खेळ प्रकार -फॉईल), द्वितीय-दूर्वांक संदीप सावंत(खेळ प्रकार -ईपी), तृतीय- दुर्गेश गंगाराम सुद्रिक (खेळ प्रकार- सेबर). १७ वर्षांखालील मुलींचा गट: द्वितीय-मनाली अरुण घाडीगावकर (खेळ प्रकार- फॉईल), तृतीय-श्रावणी संतोष राणे (खेळ प्रकार-फॉईल), द्वितीय-भूमी आनंद पाडावे (खेळ प्रकार- ईपी ).१४ वर्षांखालील मुलांचा गट : द्वितीय-शौर्य राजेश भोगले (खेळ प्रकार -ईपी), तृतीय- शुभम मनोहर तेली (खेळ प्रकार -फॉईल).१४ वर्षांखालील मुलीचा गट: द्वितीय-प्राजक्ता पंढरी देसाई (खेळ प्रकार -फॉईल), तृतीय- तनुष्का विजय गावकर (खेळ प्रकार -फॉईल), द्वितीय- आयुष्का आत्माराम गावकर(खेळ प्रकार -ईपी) तृतीय-तन्वी अरुण घाडीगावकर(खेळ प्रकार -सेबर) यांनी क्रमांक पटकाविले.
या विद्यार्थ्यांची निवड कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे. विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक क्रीडा शिक्षक श्री. सावळ यांचे कळसुली शिक्षण संघ मुंबईचे संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक व्ही. व्ही.वगरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकांनी अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.














