खुल्या रस्सीखेच स्पर्धेत कलेश्वर वेत्ये संघानं मारली बाजी !

कलेश्वर वेत्ये विरूद्ध स्टार किंग निरवडे यांच्यात रंगला अंतिम सामना
Edited by: विनायक गांवस
Published on: January 02, 2023 17:02 PM
views 320  views

सावंतवाडी : नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर भिल्लवाडी गृपच्यावतीन भव्य दिव्य खुली रस्सीखेच स्पर्धा रविवारी १ जाने. रोजी मळगाव येथे आयोजित करण्यात आली होती. सावंतवाडी, कुडाळ, कोल्हापूर, वेंगुर्लासह एकुण दहा संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत कलेश्वर वेत्ये विरूद्ध स्टार किंग निरवडे यांच्यात अंतिम सामना रंगला. यात कलेश्वर वेत्ये संघाने बाजी मारत विजेतेपद पटकावत प्रथम पारितोषिक २१ हजारांचे ते मानकरी ठरले. विजेत्या कलेश्वर वेत्ये संघाला वेत्ये गावचे नवनिर्वाचित सरपंच गुणाजी गावडे यांच्या हस्ते जर्सीच वाटप करण्यात आले. 


गुणाजी गावडे म्हणाले, नववर्षाच स्वागत कलेश्वर वेत्ये संघानं विजेतेपद पटकावत केलं आहे. वर्षाच्या सुरुवातीला संघाची सुरू झालेली दमदार सुरूवात शेवटपर्यंत कायम राहील‌ असा विश्वास वेत्ये सरपंच गावडे यांनी व्यक्त केला. यामध्ये स्टार किंग निरवडे उप विजेता तर फ्रंटमॅन अभिषेक तेंडोलकर ( कलेश्वर वेत्ये), लास्ट मॅन राजा मांजरेकर ( स्टार किंग निरवडे) ठरले‌. यावेळी सरपंच गुणाजी गावडे, उपसरपंच शितल खांबल, पांडुरंग राऊळ यांसह स्पर्धक उपस्थित होते.