देवगड : जामसंडे सन्मित्र मंडळ, जामसंडे यांच्यावतीने जिल्हास्तरीय निमंत्रित पुरुष व महिला खुलागट कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलंय.
गेली ५ वर्षे कबड्डी स्पर्धेबरोबर जिल्हास्तरीय कुस्ती, कॅरम, बुद्धीबळ व डॉजबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी मंडळाने जिल्हास्तर पुरुष व महिला(निमंत्रीत) खुलागट कबड्डी स्पर्धा दि. २२ ते २३ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजीत केली असून या स्पर्धेचा उदघाटन सोहळा दि. २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.०० वाजता संपन्न होणार आहे. या उदघाटन सोहळ्याला उदघाटक म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी लाभले आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची उपस्थिती लाभणार आहे.
स्पर्धा आयोजनासाठी मंडळाला सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन व देवगड तालुका कबड्डी असोसिएशन, यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे. कबड्डी स्पर्धा दिवस-रात्र प्रकाशझोतात होणार असून यासाठी २ मैदाने करणेत येणार आहेत. तसेच प्रेक्षक गॅलरी, मान्यवर गॅलरी,आदी व्यवस्था करण्यात आली आहे.