वेंगुर्ला : हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेबांची शिवसेना वेंगुर्ला पुरस्कृत, सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन व वेंगुर्ला तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने, जय मानसीश्वर संघ आयोजित भव्य जिल्हास्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन दिनांक २३ व २४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते रात्री ११ या वेळेत खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला या ठिकाणी करण्यात आले आहे.
या स्पर्धेत विजेत्या संघाला रोख १५ हजार व आकर्षक चषक, उपविजेत्या संघाला रोख १० हजार व आकर्षक चषक, तृतीय व चतुर्थ विजेत्या संघांना प्रत्येकी २५०० व आकर्षक चषक तसेच अष्टपैलू खेळाडूस रोख १ हजार व सन्मानचिन्ह, उत्कृष्ट चढाई साठी रोख ५०० व सन्मानचिन्ह, उत्कृष्ट पकडसाठी रोख ५०० व सन्मान चिन्ह ठेवण्यात आले आहे. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभागी व्हावे. तसेच या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सुनील डुबळे 9422434815, हेमंत गावडे 9421235128, भक्तीयश साळगावकर 7028279057 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.