सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या स्पर्धांवर कबड्डीपटूंचा बहिष्कार..!

Edited by: विनायक गावस
Published on: September 25, 2023 12:49 PM
views 259  views

सिंधुदुर्ग : जिल्हा कबड्डी फेडरेशनकडूनजिल्ह्यातील कबड्डीपटूंवर होणारा अन्याय तसेच जिल्ह्यातील कबड्डी स्पर्धा आयोजक,आजी-माजी कबड्डीपटू यांना विश्वासात न घेता तालुका, जिल्हा कार्यकारिणी घोषित केल्याचा निषेध व्यक्त करत जिल्ह्यातील अठरा मंडळांनी एकत्र येऊन सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या जिल्हास्तरीय स्पर्धा न खेळण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कबड्डीपटू व आयोजक यांना विश्वासात न घेता शिवाय सिंधुदुर्ग जिल्हा फेडरेशनच्या पदाधिकारी यांच्याकडून कबड्डीपटूंवर सतत होणारा अन्याय याबाबत रविवारी जिल्ह्यातील अठरा मंडळाचे खेळाडू,व्यवस्थापक, कबड्डी प्रेमी रवळनाथ मंदिर ओरोस येथे एकत्र येऊन सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त करत जिल्ह्यातील फेडरेशनच्या वतीने घेण्यात येणा-या स्पर्धा न खेळण्याचा एकमताने निर्णय घेतला. यावेळी पंचक्रोशी फोंडाघाट,जय महाराष्ट्र सावंतवाडी,शिवभवानी सावंतवाडी,सिंधुपुत्र कोळोशी,यंगस्टार कणकवली, लक्ष्मीनारायण वालावल,शुभम स्पोर्ट्स देवगड, संघर्ष कोचरा, रवळनाथ रानबांबूळी,जय शिवारा कणकवली, गरुडझेप कणकवली, याक्षणी माणगाव,जय भवानी नेरूळ,गांधयाळे,विजय प्रतिष्ठान सावंतवाडी,दिर्बादेवी पाटकरवाडी देवगड,दिप वॉरियर्स सावंतवाडी,जय गणेश पिंगुळी,कलेश्वर नेरूळ मंडळांचे प्रतिनिधी,आयोजक, कबड्डी प्रेमी, खेळाडू आदी उपस्थित होते. यावेळी एकमताने हा निर्णय घेण्यात आला.