दोडामार्गमध्ये रंगणार कबड्डीचा थरार

दीपक केसरकर मित्रमंडळाचे आयोजन
Edited by: संदीप देसाई
Published on: February 15, 2024 14:43 PM
views 169  views

दोडामार्ग :  येत्या १७ व १८ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित शालेय शिक्षणमंत्री दीपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत आमदार चषक भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन दोडामार्ग येथे करण्यात आले आहे. 

 राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या स्पर्धांचे उद्घाटन होणार आहे. यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी,  जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, महिला जिल्हाप्रमुख एड. नीता सावंत, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष राजन पोकळे  सावंतवाडी,    नगराध्यक्ष कसई दोडामार्ग चेतन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. तालुक्यातील कबड्डी प्रेमींना या निमित्तानं तालुका व राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार याची देही याची डोळा पाहायला मिळणार आहे. निमंत्रित संघ असल्याने स्पर्धा वेळेवर व दर्जेदार होणार असल्याने जिल्हयातील क्रीडा प्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन दोडामार्ग तालुका शिवसेनेनं केला आहे. 

तालुका शिवसेना शिलेदार ॲक्टीव्ह मोडवर...

आमदार व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मित्रमंडळ यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या भव्य कबड्डी स्पर्धेने तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी अतिशय ॲक्टीव्ह मोडवर कामाला लागले आहेत. तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस यांसह पदाधिकारी  राजेंद्र निंबाळकर, तुकाराम बर्डे,  प्रेमानंद देसाई, शैलेश दळवी,  गोपाळ गवस, दयानंद धाउसकर, विलास सावंत,  बाबाजी देसाई,  तिलकंचन गवस, मायकल लोबो, रामदास मेस्त्री, संजय गवस,  हर्षद सावंत,  रामदास देसाई, विशांत तळवडेकर, अनिल शेटकर, कांता गवस, प्रवीण गवस, विनायक शेटये, भगवान गवस, श्रीमती. चेतना गाडेकर,  योगेश महाले, श्रीमती. मनीषा गवस, कु. शितल हरमलकर, गोकुळदास बोंद्रे, कु.करुणा मोर्लेकर,  गुरुदास सावंत व कार्यकर्ते आदींच्या व माध्यमातून या स्पर्धेचे चोख नियोजन व स्पर्धेची जोरदार पूर्व तयारी सुरू आहे. त्यामुळे या स्पर्धा निमित्ताने प्रथमच तालुक्यात भव्य कबड्डीचा थरार पाहायला मिळणार आहे.