कणकवली : ARM म्हणजेच अभय राणे मित्रमंडळ आयोजित कबड्डी लीग स्पर्धेचा महासंग्राम 19 ते 21 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या नियोजनाची बैठक 20 डिसेंबर बुधवारी कणकवली चौंडेश्वरी मंदिर येथे सायंकाळी पार पडली. यावेळी स्पर्धेमध्ये किती संघाचा समावेश असणार तसेच स्पर्धेच्या अटी आणि शर्ती यासंबंधी चर्चा झाली. दरवर्षी जिल्ह्यातून या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. पुरुष गटासाठी कणकवली तालुकास्तरीय लीग तर महिला गटांसाठी 65 किलो वजनी गटामध्ये जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्याचे या बैठकीत ठरवण्यात आले.
गेली ३ वर्ष अभय राणे मित्र मंडळाच्यावतीने ही कबड्डी लीग भरवण्यात येते. याच कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून यु मुंबाचे खेळाडू देखील घडले आहेत. दरवर्षी या स्पर्धेला मोठ्या संख्येने खेळाडू उपस्थित असतात. तसेच कबड्डी प्रेमी देखील ही कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी करतात. त्यामुळे मंडळाने एक महिना आदी स्पर्धेचे नियोजन केले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी महिलांसाठी अमिता राणे 9975853532, पुरुष गटासाठी, यश पालव 9403070166, सागर राणे 7841878406 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष ओंकार राणे आणि उपाध्यक्ष सर्वेश राणे यांनी केले आहे.यावेळी मंडळाचे मार्गदर्शक अभय राणे, अध्यक्ष ओंकार राणे उपाध्यक्ष सर्वेश राणे,अमिता राणे , औदुंबर राणे, रुपेश वाळके, सागर राणे, वेंकटेश सावंत, रुपेश केळुसकर ,पंकज पेडणेकर, रोहन राणे, , सुधाकर उर्फ बंडू राणे, रुपेश साळुंखे ,यश पालव अभिषेक चव्हाण, समीर सावंत, संदेश आरडेकर, शुभम कलिंगड, मयूर मेस्त्री, आत्माराम उर्फ दादू राणे, बबलू पवार उपस्थित होते.