पत्रकार उतरणार क्रिकेटच्या मैदानात

जिल्ह्यातील सर्व तालुका पत्रकार संघांनी स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन
Edited by: विनायक गांवस
Published on: January 12, 2023 09:46 AM
views 317  views

सावंतवाडी : तालुका पत्रकार संघातर्फे 20 जानेवारी रोजी जिमखाना मैदानावर जिल्ह्यातील पत्रकारांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  पत्रकारांना नेहमीच्या कामातून विरंगुळा मिळावा म्हणून सलग दुसऱ्या वर्षी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी खास समितीही स्थापन करण्यात आली आहे या समितीच्या प्रमुखपदी सचिन रेडकर यांची नियुक्ती केली आहे. या समितीत मयूर चराटकर, हरिश्चंद्र पवार, उमेश सावंत, जतीन भिसे, विनायक गावस  यांचा समावेश आहे.


पत्रकार संघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सचिन रेडकर -9403197419, मयूर चराटकर -9405827169यांच्याशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील सर्व तालुका पत्रकार संघांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, सचिव प्रसन्न राणे, खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांनी केले आहे.