माजी नगरसेवकांना भिडणार पत्रकार ; उतरणार मैदानात !

Edited by: विनायक गावस
Published on: January 09, 2024 17:02 PM
views 415  views

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदचे माजी नगरसेवक व सावंतवाडीतील पत्रकार यांच्यात हलक्या चेंडूचा मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना येथील स्वार हाॅस्पीटल च्या समोरील मैदानावर रविवारी १४ जानेवारीला सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मैत्रीपूर्ण सामन्यात पत्रकार तसेच माजी नगरसेवक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन माजी नगरसेवक उमाकांत वारंग यांनी केले आहे.

सावंतवाडीतील पत्रकार व नगरसेवक यांच्यात दरवर्षी मैत्रीपूर्ण क्रिकेट सामने होत होते. पण, मागील चार ते पाच वर्षांत ही परंपरा खंडित झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा असे सामने होण्यासाठी माजी नगरसेवक उमाकांत वारंग यांच्यासह सर्वच माजी नगरसेवकांनी पुढाकार घेतला असून त्यातून हा सामना होणार आहे. यासाठी पत्रकार व माजी नगराध्यक्ष नगरसेवक यांनी उपस्थित राहाण्याचे आवाहन माजी नगरसेवक उमाकांत वारंग यांच्याकडून करण्यात आले आहे.