गतविजेत्या वेंगुर्लेचा सावंतवाडीकडून पराभव

सिंधुदुर्गनगरी पत्रकार 'आमने-सामने'
Edited by: विनायक गांवस
Published on: January 29, 2025 15:47 PM
views 336  views

सावंतवाडी : जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ आयोजित स्पर्धा रंगल्या असून सावंतवाडी विरुद्ध वेंगुर्ला सामन्यात सावंतवाडी पत्रकार संघाने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेंगुर्ला संघाने या सामन्यात दमदार फलंदाजी करीत निर्धारित 4 षटकात तब्बल 46 धावा फटकावल्या व सावंतवाडी संघासमोर विजयासाठी 24 चेंडूत 47 धावांचे खडतर आव्हान ठेवले. या धावांचा पाठलाग करीत सावंतवाडी संघाकडून राजारान धुरी यांनी तुफानी खेळी केली.

तर सचिन रेडकर यांनी दमदार फलंदाजी केली. शेवटी अनिकेत गावडे यांच्या दोन चौकार आणि एका उत्तुंग षटकारमुळे सावंतवाडी संघाने एक चेंडू शिल्लक असताना विजय मिळविला व दमदार आगेकूच केली आहे. दमदार फटकेबाजीमुळे सावंतवाडी संघाने हा विजय मिळविला. या स्पर्धेत जिल्ह्यातील तमाम पत्रकार बांधव आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत आहेत.