भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रोमांचक सामना रविवारी पूर्ण होऊ शकला नाही. पावसामुळे अर्ध्यात थांबलेला सामना सोमवारी झाला. पाकिस्तानला विजयासाठी 357 धावांचे मोठे लक्ष्य मिळाले, पण त्यांचे फलंदाज एकापाठोपाठ एक विकेट गमावत गेले. पाकिस्तान संघ 32 षटकांमध्ये अवघ्या 128 धावा करून सर्वबाद झाला. भारताने हा सामना 228 धावांनी जिंकला. कुलदीप यादव भारतासाठी मॅच विनर ठरला, ज्याने अपघ्या 25 धावा खर्च करून 5 विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी भारतायने रविवारी 24.1 षटकात 2 बाद 147 धावा केल्या होत्या. पण पावसामुळे खेळ अर्ध्यात थांबवला गेला. सोमवारी भारतीय संघ 147 धावांपासून पुढे खेळला. विराट कहोली 7*, तर केएल राहुल याने 17* धांवापासून पुढे खेळायला सुरुवात केली. सोमवारी खेळपट्टीवर आल्यानंतर विराटच्या बॅटमधून 122*, तर राहुलच्या बॅटमधून 111* धावांची महत्वपूर्ण खेळी आली. त्याआधी सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी अनुक्रमे 56 आणि 58 धावांची खेळी केली होती.
इमाम उल हक (9), बाबर आझम (10), मोहम्मद रिझवान (2), शादाब खान (6), फहीम अश्रफ (4) यांच्यातील एकही फलंदाज 10 धावांपेक्षा मोठी खेळी करू शकला नाही. आघा सलमान आणि इफ्तिखार अहमद यांनी प्रतेयीक 23-23 धावांची खेळी केली. पाकिस्तानसाठी सर्वाधिक 27 धावा सलामीवीर फखर झमान याने केल्या. त्यांच्या एकाही खेळाडूला अर्धशतक करता आले नाही. भारतासाठी कुलदीप यादव याने 8 षटकात 25 धावा खर्च करून सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली