भारतीय संघाचा पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार

चॅम्पियन्स ट्रॉफी : बीसीसीआयने आयसीसीकडे दिला विशेष प्रस्ताव
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: July 13, 2024 07:32 AM
views 113  views

मुंबई: पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या तयारीत आहे. पण भारतीय खेळाडू पाकिस्तानात जाण्यास तयार नाहीत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचाही (बीसीसीआय) यासंबधी काही हेतू दिसत नाही. एका रिपोर्टनुसार टीम इंडियाचे खेळाडू पाकिस्तानला जाण्याच्या मूडमध्ये नाहीत.
याबाबत बीसीसीआय लवकरच आयसीसीशी बोलू शकते. २००९ मध्ये पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर हल्ला झाला होता. टीम इंडियाच्या खेळाडूंनाही सुरक्षेची चिंता सतावत आहे.
टीम इंडियाचे अनेक खेळाडू पाकिस्तानात जाऊन खेळायला तयार नाहीत. यासोबतच बोर्डही पाकिस्तानात जाण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. जर टीम इंडिया पाकिस्तानला गेली नाही तर ही स्पर्धा हायब्रीड मॉडेल अंतर्गत आयोजित केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत टीम इंडिया आपले सामने श्रीलंका किंवा दुबई येथे खेळू शकते.
दहशतवादी घटनांमुळे पाकिस्तानचा रेकॉर्ड चांगला राहिलेला नाही. श्रीलंकेचा संघ २००९ मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. श्रीलंकेचे खेळाडू टीम बसमध्ये होते आणि लाहोरमध्ये त्यांच्यावर हल्ला झाला. या दहशतवादी हल्ल्यात ५ पोलीस शहीद झाले होते. यासोबतच ६ खेळाडूही जखमी झाले होते. त्यामुळे अनेक वर्षे कोणताही संघ पाकिस्तानशी खेळायला गेला नव्हता.


भारत न गेल्याने पाकिस्तानचे होणार मोठे नुकसान
टीम इंडियाने अनेक दिवसांपासून पाकिस्तानविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही. यासोबतच टीम इंडिया आता चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाण्यास तयार नाही. आशिया चषकासाठीही टीम इंडिया पाकिस्तानमध्ये गेली नव्हती. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून ते अजूनही सुरूच आहे.