ब्युरो न्यूज : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या दिवसातील खेळ संपला.यात भारताकडे ५२ धावांनी आघाडी घेत इंग्लंडने पहिला डाव २४७ धावांनी आटोपता घेतला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुरु असलेला सामना इंग्लंड मधील ओव्होल या मैदानावर खेळला जात आहे .यावेळी भारताने दुसऱ्या डावात दोन बाद ७५ धावा करून इंग्लंडविरुद्ध ५२ धावांची आघाडी घेतली आहे. असे असले तरी यजमान संघाचा पहिला डाव हा २४७ धावांवर संपला होता आणि भारताने पहिल्या डावात २२४ धावा केल्या होत्या. या आधारावर इंग्लंडला २३ धावांची आघाडी मिळाली होती. यशस्वी जैस्वाल आणि के एल राहुल यांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली . या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी झाली होती मात्र नंतर ती जोश टंगने मोडली. यावेळी त्याने रूटने झेलबाद केले. २८ चेंडूत सात धावा केल्यात आणि तो पॅव्हेलियनमध्ये परतला .त्यानंतर फलंदाजीसाठी साई सुदर्शन आला आणि त्याने ११ धावा केल्यात आणि गस अॅटकिन्सनने एलबीडब्ल्यू याने त्याला बाद केले . दरम्यान यशस्वी जैस्वाल याने ४४ चेंडूत त्याचे १३ वे अर्धशतक पूर्ण केले .सध्या चालू असलेल्या मालिकेतील हे त्याचे तिसरे अर्धशतक आहे .या दिवसाच्या खेळ अखेरीस डावखुरा फलंदाज ५१ आणि आकाश दीप चार धावांवर खेळत आहेत.