भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत भारताला पहिल्यांदा फलंदाजीचं आव्हान दिलं. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी केली. पण सात षटकांचा सामना संपताच मैदानात एक पळापळ सुरु झाली. प्रेक्षकांना नेमकं कळलंच नाही मैदानात इतकी पळापळ का सुरु आहे. आठवं षटकं सुरु होण्यापूर्वी सामना थांबवला होता. त्यामुळे प्रेक्षकांची कुजबूज सुरु झाली आणि कॅमेरामननं मैदानातील सापाकडे लक्ष वेधलं. साप पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. अखेर सापाल पकडताच सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.
साप मैदानात आल्याचं पाहून सपोर्ट स्टाफ तिथे पोहोचला आणि सापाला पकडून बाहेर नेलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.