ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

सुर्याकुमार यादव कर्णधार
Edited by: ब्युरो
Published on: November 21, 2023 12:38 PM
views 238  views

वनडे विश्वचषकाच्या समाप्तीनंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. 23 नोव्हेंबर पासून खेळल्या जाणाऱ्या या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करेल. तर उपकर्णधार ऋतुराज गायकवाड असणार आहे. अखेरच्या दोन सामन्यासाठी श्रेयस अय्यर हा संघात सामील होईल.


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार


भारत वि ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेचे वेळापत्रक:

  • पहिला टी20 विशाखापट्टणम ( 23 नोव्हेंबर)
  • दुसरा टी20 तिरूअनंतपुरम (26 नोव्हेंबर)
  • तिसरा टी20 गुवाहाटी (28 नोव्हेंबर)
  • चौथा टी20 नागपूर (1 डिसेंबर)
  • पाचवा टी20 हैदराबाद (3 डिसेंबर)