एकदिवसीय विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत यजमान भारताने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला आहे. चार वर्षांनंतर उपांत्य फेरीत पुन्हा एकदा दोन्ही संघ आमनेसामने आले. गेल्या वेळी २०१९ मध्ये किवी संघाने कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न भंग करून अंतिम फेरीत धडक मारली होती. यावेळी भारताने न्यूझीलंडला हरवून मागील पराभवाचा बदला घेतला. आता भारतीय संघ १९ नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये अंतिम सामना खेळणार आहे. भारताचा सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी होईल. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चार गडी गमावून ३९७ धावा केल्या. प्रत्युत्तरात किवी संघ सर्व विकेट्स गमावून केवळ ३२७ धावा करू शकला.
विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडसमोर यजमान भारताने कडवे आव्हान ठेवले आहे. चार वर्षांनंतर या फेरीत दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ३९७/४ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना भारताने चार गडी गमावून ३९७ धावा केल्या. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ११७ धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने १०५ धावांची खेळी केली. शुभमन गिलने नाबाद ८० धावा केल्या. कर्णधार रोहितने ४७ आणि लोकेश राहुलने ३९ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने तीन विकेट्स घेतल्या त्याला ट्रेंट बोल्टने एक विकेट घेत साथ दिली.