भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना रांचीमध्ये खेळला जात आहे. तसेच कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने दिलेले 192 धावांचे आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात पार करत मालिका खिशात टाकली. भारताने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी मिळवली आहे.
तसेच भारताने चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी बिनबाद 40 धावांपासून सुरूवात केली होती. सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्माने ही भागीदारी 84 धावांची सलामी दिली होती. तर रोहित अर्धशतक ठोकले मात्र 37 धावांवर रूटने यशस्वीला बाद केलं आहे. त्यानंतर भारताची गळती सुरू झाली होती. तर रोहित शर्मा 55 धावा करून बाद झाला अन् त्यानंतर आलेला रजत पाटीदार शुन्य धावांची भर घालून परतला. भारताची अवस्था 3 बाद 100 धावा अशी झाली असताना शुभमन गिल आणि रविंद्र जडेजाने 20 धावांची भागीदारी केली होती.
मात्र लंचनंतर इंग्लंडने पुन्हा भारताला दोन धक्के दिले. यामध्ये बशीरने जडेजाला 4 धावांवर तर सर्फराज खानला शुन्यावर बाद करत भारताची अवस्था 5 बाद 120 धावा अशी केली होती. मात्र शुभमन गिलने संघ अडचणीत सापडला असताना संयमी अर्धशतकी खेळी केली. त्याला ध्रुव जुरेलने उत्तम साथ देत 39 धावा करत 72 धावांची भागीदारी रचली आहे.
दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 353 धावांवर संपला होता. ज्यात जो रूटने शानदार शतक झळकावले. यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात 307 धावांवर आटोपला होता. तर भारताकडून यशस्वी जयस्वाल (73) आणि ध्रुव जुरेल (90) यांनी धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडचा डाव 145 धावांवर आटोपला आणि भारतासमोर हे लक्ष्य ठेवण्यात आले. भारतीय संघाने आजचा हा सामना जिंकून मालिकेत 3-1 पुढे आहे. तसेच पाचवा कसोटी सामना हा धर्मशाळा येथे 7-11 मार्च दरम्यान खेळवण्यात येणार आहे.