सिंधुदुर्गनगरी : राज्यस्तरीय शालेय बुध्दीबळ क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन दिनांक १७ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता मामाचो गाव रिसॉर्ट हिर्लोक येथे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली आहे.
यावेळी प्रमुख उपस्थितीत जिल्हा प्ररिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, कोल्हापूर विभागाचे क्रीडा व युवकसेवा उपसंचालक संजय सबनीस, कुडाळ तहसिलदार अमोल पाठक, मामाचो गाव रिसॉर्ट हिर्लोक चे संचालक अनंत सावंत हे उपस्थित राहणार आहेत.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्याव्दारे १४ वर्षाखालील मुले व मुली यांच्यासाठी आयोजित करण्यात आले आहे.