वेंगुर्ला : रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन मार्फत तसेच रोटरी क्लब ऑफ बांदा,रोटरी क्लब ऑफ कॅश्यूसिटी दोडामार्ग व रोट्रॅक्ट सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २ दिवशीय मल्टिडिस्ट्रिक्ट रायला चे आज पहिल्या दिवशी हॉलीबॉल प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन पार पडले. NIS कोच तसेच आंतरराष्ट्रीय FIVB सन्मानपात्र अतुल सावडावकर यांनी उपस्थित मुलांचा मार्गदर्शन वर्ग घेतला. यावेळी सिंधुदुर्गातून आंतरराष्ट्रीय हॉलीबॉल प्लेयर तयार करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे तसेच डिस्ट्रिक्ट 3170 चे प्रांतपाल मा नासिरभाई बोरसादवाला यांनी उपस्थित मुलांना प्रोत्साहन देत मार्गदर्शन केले. सोबत रोटरी वेंगुर्ला चे अध्यक्ष राजू वजराटकर, इव्हेंट चेअरमन ऍड प्रथमेश नाईक, ट्रेजरर पंकज शिरसाट, TRF चेअर दिलीप गिरप, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश घाटवळ, रो.आनंद बोवलेकर, रो.अनमोल गिरप, रो.सुरेंद्र चव्हाण, हेमंत गावडे, नॅशनल हॉलीबॉल प्लेयर सॅम फर्नांडिस आदी उपस्थित होते.
उद्या सकाळी ठीक 8.30 वाजता मल्टिडिस्ट्रिक्ट रायला हॉलीबॉल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. दिवसभर सुरू राहणाऱ्या या हॉलीबॉल स्पर्धाचा थरार अनुभवण्यासाठी हॉलीबॉल प्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला प्रेसिडन्ट राजू वजराटकर यांनी केले आहे .