व्हरेनियम आणि कोकण नाऊ आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

Edited by: प्रतिनिधी
Published on: February 15, 2023 23:29 PM
views 216  views

मालवण : व्हरेनियम आणि कोकण नाऊ आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी निलेश राणे यांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. 

मलवणच्या टोपीवाला हायस्कुलच्या  बोर्डिंग ग्राउंडवर 15 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत या स्पर्धा होत आहेत. बुधवारी या स्पर्धेचे माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते आणि  व्हरेनियमच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन झाले. यावेळी विशाल सेवा फाउंडेशनचे सर्वेसर्वा तथा उद्योजक विशाल परब, व्हरेनियम क्लाऊडचे चीफ ऍड नेटवर्क हेड मुंबई मुकुंदन राघवन, व्हरेनीअम हेड अँड आयटी मॅनेजर विनायक जाधव, बँक ऑफ बरोडाचे कुणालकुमार, जि. प. चे माजी अध्यक्ष अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, आबा हडकर, राजू बिड्ये, भाई मांजरेकर, कोकण नाऊचे संचालक विकास गावकर, सौ. वैशाली गावकर, ओंकार गावकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी निलेश राणे यांनी काही चेंडू खेळत चांगली फटकेबाजी केली. त्यानंतर  झालेल्या उदघाटन सोहळ्यात मान्यवरांनी स्पर्धेचे कौतुक केले. विशाल परब यांनीही स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. 


उदघाटन सोहळ्यानंतर सातेरी कर्ली विरुद्ध एस एस वारीयर्स या संघामध्ये सामना झाला. हा सामना सातेरी कर्ली संघाने जिंकला. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ज्येष्ठ समालोचक बादल चौधरी यांनी केले. या स्पर्धेसाठी  बादल चौधरी, श्याम वाक्कर, उमेश परब, अमोल जमदाडे, समीर चव्हाण यांनी समालोचन केले. आंबरोज  अलमेडा, सुशील शेडगे, उमेश मांजरेजर, मंगेश धुरी, दीपक धुरी यांनी पंचगिरी केली. स्पर्धा प्रमुख म्हणून बंटी केरकर काम पाहत आहेत. 


स्पर्धेतील विजेत्यासाठी रोख रु. २ लाख ५१ हजार, उपवीजेत्यासाठी २ लाख २५ हजार, तिसऱ्या क्रमांकासाठी रु. २५ हजार , चौथ्या क्रमांकासाठी रोख रु. २१ हजार आणि  चषक दिले जाणार आहेत.