शालेय विभागस्तर कॅरम स्पर्धेत सिंधुदुर्गची दमदार कामगिरी !

Edited by: विनायक गावस
Published on: December 05, 2023 15:49 PM
views 190  views

सावंतवाडी : २८ व २९ नोव्हेंबर २०२३ रोजी क्रिडा व युवक संचलानलय, महाराष्ट्र राज्य, पुणे, रत्नागिरी क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी अंतर्गत, जिल्हा क्रीडा परिषद द्वारा आयोजित विभागीय शालेय कॅरम स्पर्धा २०२३-२४ मारुती मंदीर, रत्नागिरी येथे पार पडली. १४, १७ व १९ वर्षांखालील मुले व मुली अशा वयोगटात सिंधुदुर्ग, रत्नागिरी , कोल्हापूर , सांगली , सातारा , कोल्हापूर शहर ,  सांगली शहर व इचलकरजी शहर अशा ८ जिल्ह्यातून व प्रभागातून संघ दाखल झाले.


दरवर्षी प्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुला-मुलींनी दमदार कॅरमचे प्रदर्शन करत हिंगोली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत कोल्हापूर विभागीय संघात आपले स्थान नक्की केले.  प्रणिता नथुराम आयरे U/17  विजेती, दिक्षा नंदकिशोर चव्हाण U/19  विजेती, साक्षी रमेश रामदुलकर U/14  उपविजेती,क्षितिजा विजय मुंबरकर U/19  उपविजेती पूर्वा दीपक केतकर U/14 तृतीयसुधांशु महेश धुरी U/14 उपविजेता,अमुल्य अरुण घाडी U/17  तृतीय,शम प्रकाश फाले U/19 तृतीय, देवांग रमाकांत मल्हार U/17 चौथा,प्रबोध सुनिल जाधव U/17 चौथा सर्व विजेत्यांचे सिंधुदुर्ग डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष अॅड अवधूत भणगे यांनी अभिनंदन केले.