'इनडोअर गेम्स'मध्ये उद्यानविद्याचे घवघवीत यश

Edited by: विनायक गावस
Published on: October 19, 2023 20:02 PM
views 178  views

सिंधुदुर्ग : डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली आयोजित आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा (स्पोर्टेक्स २०२३)" इनडोअर गेम्स" ७ व ८ ऑक्टोबर २०२३ रोजी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, दापोली येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये उद्यानविद्या महाविद्यालयाच्या २६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेमधील बॅडमिंटन, बुद्धिबळ आणि टेबल टेनिस क्रीडा प्रकारामध्ये या महाविद्यालयाच्या खेळाडूंनी दैदिप्यमान यश प्राप्त केले.

बॅडमिंटन या खेळामध्ये मुलींच्या संघाने (कु अवंतिका काळे, कू मनीषा सावंत, कू. दिव्याक्षी सावंत, कू. शियाली थोरात) प्रथम क्रमांक तर मुलांच्या संघाने (कू. मनन पटेल, कू प्रियेश धुरी, कू ओवेश नाडकर, कू स्वीकार जाधव, कू टी पी कारमुगीलन) तृतीय क्रमांक प्राप्त केला.

टेबल टेनिस या खेळामध्ये मुलांच्या संघाने (कू टी पी कारमुगीलन, कू फहीर मोहम्मद, कू स्वीकार जाधव, कू मानस प्रभू) व्दितीय क्रमांक प्राप्त केला. त्याच प्रमाणे बुद्धिबळ या क्रीडा प्रकारात मुलांच्या संघाने (कू प्रियेश धुरी, कू शशांक साळुंखे, कू प्रणव सिदानकर, कू जस्विन थॉमस आणि कू राज नाईक) व्दितीय क्रमांक तर मुलींच्या संघाने (कू पल्लवी भामरे, कू वरदा चव्हाण, कू शियाली थोरात, कू सृष्टी पेंडूरकर, कू प्रीती मालाबणकर) तृतीय क्रमांक प्राप्त केला.विद्यार्थ्यांनी सर्व क्रीडा प्रकारामध्ये मिळवलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजन खांडेकर यांनी विशेष कौतुक केले. तर सर्व सहभागी खेळाडूंना महाविद्यालयाचे प्रभारी क्रीडा अधिकारी प्रा. हर्षवर्धन वाघ तसेच महाविद्यालयीन प्राध्यापक वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याच प्रमाणे वरील क्रीडा स्पर्धेसाठी संघ व्यवस्थापक म्हणून डॉ. परेश पोटफोडे, डॉ. आशुतोष पवार, डॉ. विजय पलसांदे यांनी काम पाहिले. तसेच एफ. एस. अकॅडमी कुडाळ येथील श्री. समद शेख आणि श्री. हमीद शेख यांचे सर्व क्रीडा प्रकारात तांत्रिक मार्गदर्शन लाभले.