
लंडन: भारतिवरुद्ध इंग्लंड कोसटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील शेवटचा आणि पाचवा कसोटी सामना ओव्हलमध्ये रंगला. या निर्णायक कसोटीत भारताचा विजय झाला आणि मालिका बरोबरीत सुटली. भारताने हा सामना सहा धावाने जिंकला. चौथ्या दिवसापर्यंत सामन्यात आघाडीवर असलेला इंग्लंड संघ पाचव्या दिवशी कोसळला. ओव्हल कसोटीच्या शेवटच्या दिवशी टीम इंडियाने इंग्लंड संघाचा 6 धावांनी पराभव केला. यासह, ५ सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली.
शेवटच्या दिवशी इंग्लंडला 35 धावांची आवश्यकता होती, तर त्यांच्याकडे 4 विकेट शिल्लक होत्या. मोहम्मद सिराजने भारतासाठी शानदार गोलंदाजी केली आणि टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात तो सर्वात मोठा हिरो ठरला. भारताने शेवटच्या डावात इंग्लंडला 374 धावांचे लक्ष्य दिले होते. हा भारताचा सर्वात कमी धावांच्या फरकाने विजय आहे. यापूर्वी भारतीय संघाने युवा शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली एजबॅस्टन येथे इंग्लंड संघाचा पराभव केला होता, तर मँचेस्टर कसोटी अनिर्णित राहिली होती.
चौथ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस इंग्लंडने 76.2 षटकांत 6 विकेट्सच्या मोबदल्यात 339 धावा केल्या होत्या. पावसामुळे खेळ लवकर संपवावा लागला. शेवटच्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी 4 विकेट्सची आवश्यकता होती, तर इंग्लंडला 35 धावांची आवश्यकता होती. सामना सुरू झाला तेव्हा प्रसिद्ध कृष्णाने टाकलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर जेमी ओव्हरटनने सलग दोन चौकार मारले.
78व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर, मोहम्मद सिराजचा एक अद्भुत चेंडू जेमी स्मिथच्या बॅटच्या काठावर लागला आणि यष्टीरक्षक ध्रुव जुरेलपर्यंत पोहोचला आणि त्याने तो झेल घेण्यात कोणतीही चूक केली नाही. जेव्हा तिसऱ्या पंचाने जेमीला बाद घोषित केले तेव्हा टीम इंडियाचा जल्लोष पाहण्यासारखा होता. मोहम्मद सिराजने आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट केली. 80 व्या षटकात, त्याने जेमी ओव्हरटनला एलबीडब्ल्यू झेल दिला. येथेही तिसऱ्या पंचाने निर्णय दिला. यानंतर प्रसिद्ध कृष्णाने टंगचे स्टंपला बाद केले.
यानंतर, जखमी ख्रिस वोक्स एका हाताने फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. दरम्यान, गस अॅटकिन्सनने एक शॉट खेळला, जो आकाश दीपला सीमारेषेवर पकडता आला नाही आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी गेला. यानंतर सिराजने गस अॅटकिन्सनला बोल्ड केले आणि भारताच्या युवांनी ही मालिका बरोबरीत काढली. सिराजने शेवटची विकेट काढून पंजा पूर्ण केला.