प्रो कबड्डी 2022 च्या दुसऱ्या दिवशी तिसरा सामना बंगाल वॉरियर्स आणि हरियाणा स्टीलर्स या संघादरम्यान खेळला गेला. दुसऱ्या सत्रात काहीशा एकतर्फी झालेल्या या सामन्यात हरियाणाने 41-33 असा विजय मिळवत विजयी सुरुवात केली. मनजीतने हरियाणासाठी सर्वाधिक 18 गुण मिळवले. मागील हंगामापेक्षा जवळपास पूर्णपणे बदललेले हे दोन संघ सुरुवातीपासून सावधगिरीने खेळत कामगिरी करत असताना पहिल्या सत्रात बंगालसाठी डिफेंडर गिरीश एर्नाकने सर्वाधिक 6 गुण कमावले. पहिल्या सत्रात खेळ 10-11 असा बंगालच्या बाजूने होता. दुसऱ्या सूत्रात दोन्ही संघांनी वेग पकडला. हरियाणासाठी मनजीत व नितीन रावल यांनी धमाकेदार कामगिरी करत संघाला मोठी आघाडी मिळवून दिली. अखेरचे सात मिनिटे शिल्लक असताना हरियाणाकडे सात गुणांची आघाडी होती. त्यांनी एकरी दुहेरी गुण घेत ही आघाडी आणखी वाढवत नेली. पूर्ण वेळानंतर संघाने 8 गुणांची आघाडी ठेवत सामना आपल्या नावे केला.