
सावंतवाडी : सिंधुदुर्ग एथलेट असोसिएशनच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या अजिंक्यपद स्पर्धा निवडणूक चाचणीत १०० मीटर धावणे आणि ४ × १०० रिले या क्रीडा प्रकारात २३ वर्षांखालील गटात हर्ष जाधव याने उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले आहे.
यासाठी त्याची सलग चौथ्यांदा मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.