कुडाळ : शिक्षक विरुद्ध विद्यार्थी इलेव्हन सामन्यात माणगाव हायस्कूलच्या शिक्षक इलेव्हन संघाने विद्यार्थी इलेव्हनवर तब्बल ३६ धावांनी मात करत हा सामना जिंकला. शिक्षक इलेव्हन संघाचे कर्णधार भरत केसरकर यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली.शिक्षक इलेव्हन संघाचे चंद्रकांत पटकारे यांनी चार चौकार व एका षटकारांसह २५धावा केल्या. तर संतोष सावंत यांनी तीन चौकारासह १९ धावा फटकावल्या.
शिक्षक इलेव्हन संघाने विद्यार्थी इलेव्हन संघासाठी ९५ धावांचे मोठे आव्हान निर्माण केले होते. धावांचा पाठलाग करताना विद्यार्थी इलेव्हन संघाने सात षटकात सात बाद ५८ धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यातून महेश पास्ते व नितीन माने यांचे दोन अप्रतिम झेल पहायला मिळाले. प्रशांत आडेलकर, शेखर भोगटे, पपू तामाणेकर, भरत केसरकर यांच्या अप्रतिम गोलंदाजीवर हा सामना एकहाती शिक्षक इलेव्हन संघाने जिंकला.
सामन्यात संतोष सावंत यांचे अप्रतिम यष्टीरक्षण पहायला मिळाले. विजयी व उपविजयी संघाचे मुख्याध्यापक प्रशांत धोंड, उपमुख्याध्यापक संजय पिळणकर, पर्यवेक्षक चंद्रकांत चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे. या सामन्याने क्रीडा महोत्सवाची सांगता झाली आहे..