ARM प्रो कबड्डीचे शानदार उद्घाटन | पहिलाच सामना झाला टाय !

आपल्या मातीतील खेळाडू यु मुंबाच्या टीममध्ये खेळतो याचा अभिमान | अभय राणे यांचं कार्य कौतुकास्पद : समीर नलावडे
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 13, 2023 09:04 AM
views 464  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील आपल्या मातीतील कबड्डी खेळत असलेला युवक यु मुंबईच्या टीममध्ये खेळतो, याचा मला अभिमान आहे. त्यामुळे अभय राणे मित्रमंडळाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्यांनी सतत ३ ऱ्या वर्षी कबड्डी स्पर्धा भरून मुलांना एक चांगली दिशा दिली. आणि कबड्डी प्रेमींची भूक भागवली त्याबद्दल त्यांचे कौतुक करतो. भाजप आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली घडत आहे.  त्यामुळे कणकवलीच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान असल्याचे, नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कबड्डीच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले.


अभय राणे मित्र मंडळाच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी ही प्रो कबड्डी होत आहे आणि त्यासाठी संपूर्ण जिल्ह्याभरातून कबड्डी रसिक कणकवलीमध्ये दाखल झाले आहेत. या कबड्डीचे उद्घाटन नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.  त्यानंतर राष्ट्रवादी नेते तथा कणकवली नगरसेवक अबिद नाईक यांच्या हस्ते कबड्डी ग्राउंडमध्ये श्रीफळ वाढवून कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली 

यावेळी कणकवली उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा नगरसेवक अबीद नाईक, नगरपंचायत आरोग्य सभापती तथा कणकवली नगरपंचायत गटनेते संजय कामतेकर, माझी नगरसेवक अभय राणे दिलीप साटम, नगरसेवक अभिजीत मुसळे, शिशिर परुळेकर, किशोर राणे, महेश सावंत,भरत उबाळे माझी कबड्डीपटू रमेश जोगळे, ज्येष्ठ पत्रकार संतोष राऊळ, संतोष सावंत ,मंडळाचे अध्यक्ष ओंकार राणे ,उपाध्यक्ष सर्वेश राणे,खजिनदार औदुंबर राणे सचिव सागर राणे,सहसचिव सुधाकर उर्फ बंडू राणे, संदेश आरडेकर, ,रोहन राणे, यश पालव, प्रथम सावंत ,रुपेश साळुंखे, व्यंकटेश सावंत समीर सावंत, रोहन चव्हाण, शिवशंकर पारगावकर रुपेश वाळके ,निखिल बागवे, रोहन चव्हाण,आदर्श राणे, विजय राणे,तेजस राणे यांच्यासह अभय राणे प्रेमी उपस्थित होते

पहिलाच सामना नमो भालचंद्र व स्वयंभू रवळनाथ मधलीवाडी मित्रमंडळ यांच्यात खेळला गेला अटीतटीचा झालेला हा सामना शेवटच्या क्षणी  टाय झाला  त्यामुळे या कबड्डी मध्ये अधिकच रंगत आली. त्यामुळे अभय राणे यांच्या वतीने घेण्यात येणारे हे प्रो कबड्डी चे रंगतदार होत असल्याने कबड्डी प्रेमी भारावून गेले,

या प्रो कबड्डी उत्कृष्ट असे समालोचन सुप्रसिद्ध समालोचक बाळू वाळवलकर तसेच  सहकारी जयेश परब यांनी उत्कृष्ट समालोचन करत कबड्डी स्पर्धेमध्ये अधिकच रंगत आणली.