राष्ट्रीय शालेय साॅफ्टबाॅल स्पर्धेत भेडशी हायस्कूलच्या भूमी सावंतला सुवर्णपदक

Edited by:
Published on: February 10, 2025 17:53 PM
views 95  views

दोडामार्ग : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा कार्यालय जळगांव आयोजित ६८ व्या शालेय राष्ट्रीय साॅफ्टबाॅल स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या १७ वर्षाखालील मुलीच्या संघास सुवर्णपदक मिळाले. न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि.काॅलेज भेडशी ता.दोडामार्ग जि.सिंधुदुर्ग प्रशालेची ५८ महा.एनसीसी बटालियन ची कॅडेट भूमी हनुमंत सावंत हिने महाराष्ट्र राज्याच्या संघातून खेळताना नेत्रदिपक कामगिरी केली. दोडामार्ग तालूक्या सारख्या ग्रामीण भागातील मुलीने मिळविलेले यश हे खरच कौतुकास्पद आहे 

धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ,मुंबई संस्था अध्यक्षा कल्पनाताई तोरसकर,कार्याध्यक्ष डाॅ.मिलिंद तोरसकर,सचिव संतोष सावंत,खजिनदार वैभव नाईक,समन्वय समिती सचिव रश्मीताई तोरसकर,सहसचिव तथा  न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनि.काॅलेज भेडशी चे प्राचार्य नंदकुमार नाईक,संस्था कार्यकारणी सदस्य,समन्वय समिती व शालेय समिती सदस्य,प्रशालेतील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक,विद्यार्थी यांनी भूमी सावंत चे अभिनंदन केले. भूमी सावंत हिला राष्ट्रीय प्रशिक्षक सोमनाथ गोंधळी व प्रशालेचे क्रीडाशिक्षक एच.आर.सावंत सर यांचे मार्गदर्शन लाभले.