सावंतवाडी : १ मे महाराष्ट्र दिन आणि सिंधुदुर्ग स्थापना दिनानिमित्त सिंधू रनर टीम ने गोवा ते सावंतवाडी इंटरसिटी १०० किलोमीटर ची अल्ट्रा रन आयोजित केली आहे. या अल्ट्रा रनची सुरवात ३० एप्रिल २०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजता श्री देवी नवदुर्गा मंदिरातुन (बोरी फोन्डा गोवा) इथून सुरु होऊन पुढे फोन्डा, मंगेशी, पणजी अट्टल सेतू, पर्वोरीम, धारगळ, तम्बोसा, बांदा मार्गे सावंतवाडी असे १०० किलोमीटर अंतर पार करून सावंतवाडी राजवाडा येथे १ मे २०२३ रोजी सकाळी ९ वाजता सांगता होईल. या रन मध्ये सिंधुदुर्गातील ११ तर इतर राज्यातून ३-४ धावत सहभागी होणार आहेत. त्यांची नावे अशी :
१. ओंकार पराडकर
२. डॉ स्नेहल गोवेकर
३. भूषण बान्देलकर
४. अद्वैत प्रभुदेसाई
५. मेघराज कोकरे
६. फ्रँकी गोम्स
७. विनायक पाटील (कोल्हापूर)
८. प्रसाद बांदेकर
९. महेश शेटकर
१०. रसिक परब
११. अनिल वर्मा (मुंबई)
१२. नेव्हिल पटेल (गुजरात)
१३. सुनील ठाकूर (पुणे)
या धावकांसोबत मदतीला निखिल सरंबळकर, हर्षल सूर्यवंशी, आकाश पार्सेकर, डॉ सिद्धार्थ म्हापसेकर इत्यादी सपोर्टर्स असणार आहेत. या रनला वैद्यकीय मदतीला ऍम्ब्युलन्स पण सोबत राहणार आहे.
श्री देवी नवदुर्गा मंदिरात (बोरी फोड गोवा) येथे पूजा करून आणि गोवा विधानसभा शिरोडा चे उमेदवार संकेत नाईक मुळे आणि बेतोडा गोवा हायस्कूल चे प्रिंसिपल माथूरदास नाईक याच्या हस्ते उद्घाटन करून या रन ला सुरवात होईल आणि सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे, कोकण साद LIVE चे मुख्य संपादक सागर चव्हाण यांच्या उपस्थितीत समाप्त होईल.