तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत फुदैल आगा यांचं घवघवीत यश

Edited by: विनायक गांवस
Published on: August 14, 2025 13:01 PM
views 81  views

सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी येथे संपन्न झालेल्या शालेय तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत १७ वर्षाखालील  विद्यार्थी गटात सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या फुदैल हसन आगा याने चौथा क्रमांक पटकावला आहे

फुदैल आगा जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी सावंतवाडी तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. फुदैल याला प्रशालेच्या क्रीडा शिक्षिका मारिया आल्मेडा यांनी मार्गदर्शन केले. सावंतवाडी मर्कझी जमात, बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका निर्मला हेशागोळ, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक - शिक्षक संघ कार्यकारीणी समितीचे पदाधिकारी यांनी फुदैल आगा याचे अभिनंदन केले व पुढील जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.