कै.सुर्यकांत पेडणेकर यांच्या स्मरणार्थ मोफत कॅरम प्रशिक्षण शिबीर

Edited by: विनायक गावस
Published on: July 07, 2023 13:16 PM
views 400  views

सावंतवाडी :  सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे संस्थापक कै.सुर्यकांत पेडणेकर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त मुक्ताई ॲकेडमीतर्फे शालेय व महाविद्यालयीन विदयार्थी-विदयार्थिनींसाठी एक दिवसाचे मोफत कॅरम प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

रविवार दि.9 जुलै रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2.00 या वेळेत शिबीर घेण्यात येईल.सावंतवाडीतील जगन्नाथराव भोसले उदयानाच्या मागील बाजूस मुक्ताई ॲकेडमीच्या जागेत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

             विदयार्थ्यांना कॅरम प्रशिक्षक आणि राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडुंचे मार्गदर्शन लाभणार आहे.सहभागी विदयार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.विदयार्थ्यांनी 8007382783 या मोबाईल क्रमांकावर नाव नोंदणी करायची आहे.प्रशिक्षण शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर आणि उपाध्यक्षा सौ.स्नेहा पेडणेकर यांनी केले आहे.