टीम शिवाजी क्लासिक बॉडी बिल्डिंगचे मानकरी ठरले माजी सैनिक राजेश हिरोजी

शरीरसौष्ठव विजेता टीम शिवाजीचा ओम सावंत, बेस्ट पोझर सातेरी जिम वेंगुर्लेचा चंद्रकांत कुबल तर मोस्ट एमप्रृव्ह रामदास राऊळ टीम शिवाजी
Edited by: विनायक गांवस
Published on: December 29, 2022 11:06 AM
views 320  views

सावंतवाडी : महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असो. व सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स असो. पुरस्कृत टीम शिवाजी क्लासिक 2022 जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग आणि मेन्स शरीरसौष्ठव स्पर्धा सावंतवाडीत पार पडली. स्पर्धकांसह रसिकांचा मोठा प्रतिसाद या स्पर्धला मिळाला. यावेळी तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. 

या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत माजी सैनिक राजेश हिरोजी, प्रो- फिटनेस, वेंगुर्ला हे विजेता ठरले. 

शरीरसौष्ठव विजेता टीम शिवाजीचा ओम सावंत,  बेस्ट पोझर सातेरी जिम वेंगुर्लेचा चंद्रकांत कुबल तर मोस्ट एमप्रृव्ह रामदास राऊळ टीम शिवाजी ठरले. शेकडो स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. पाच ते सहा राउंडमध्ये ही स्पर्धा झाली. प्रत्येक राउंडमधील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे देत गौरव करण्यात आला. विजेते राजेश हिरोजी हे माजी सैनिक असून सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी बॉडी बिल्डिंगवर मेहनत घेतली. अथक परिश्रमाच्या जोरावर त्यांनी या स्पर्धेच विजेते पद पटकावलं.


यावेळी बॉडी बिल्डर्स असो.जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, बॉडी बिल्डर अतुल आम्रे, करण चौधरी, आशिष वर्तक, डॉ. राजन जाधव, टीम शिवाजीचे शिवाजी जाधव, सतिश बागवे, यश सावंत आदी उपस्थित होते.