
भारताचा माजी स्टार क्रिकेटपटू सुरेश रैना मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्याला सक्तवसुली संचालनालय -इडीने समन्स बजावले आहे. त्याची आज 13 ऑगस्टला दिल्लीत चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याच्यावर बेटिंग अॅप्सचा प्रचार केल्याचा आरोप आहे. डिसेंबर 2024 मध्ये तो या अॅप्सचा सदीच्छा राजदूत झाला होता. केंद्र सरकारकडून वन बायबेट प्रिमॅक्ससह इतर काही बेटिंग अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे, मात्र त्यानंतर हे ॲप्स आणि या वेगवेगळ्या वेबसाईटच्या नावाने कार्यरत आहेत तसेच त्यांच्या जाहिराती केल्या जात आहेत. त्यामुळेच इडलीकडून तपास सुरु आहे.
खासबाब म्हणजे या ॲपच्या जाहिराती आणि प्रमोशनची कमान बाॅलीवूड सेलिब्रिटी, काही क्रिकेटपटू, खेळाडूंनी सांभाळलेली आहे. त्यामुळेच या प्रकरणात काही सेलिब्रिटींनाही यापुर्वी नोटीस पाठवण्यात आली होती. त्यांची चौकशी झाली असून आता सुरेश रैनालाही समन्स बजावला आहे, त्याला आज चौकशीसाठी बोलावलं आहे. त्याची आज वन बाय बेट संदर्भात त्याची चौकशी होणार आहे, यावर आता नेमकं काय होतं हे लवकरच समजेल. रेनाला पाठवण्यात आलेले समन्स हे अवैध बेटींग अॅप्स प्लॅटफॉर्मशी निगडित आहे.
ऑनलाईन बेटींग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून युजर्संची फसवणूक आणि मनी लॉन्ड्री प्रकरणं समोर आली आहे. त्यामुळे बेटिंगबाबत विविध शहरांमध्ये तपास सुरू आहे. यामध्ये सोमवारी राणा दग्गुबत्ती या दाक्षिणात्य अभिनेत्याला सुद्धा इडीने तपासासाठी बोलावलं होतं.
प्राप्त माहितीनुसार यापूर्वी माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह, युवराज सिंह यासह बॉलीवूड स्टार सोनू सूद, उर्वशी रौतेला यांची सुद्धा चौकशी झाली आहे. जुलैमध्ये या अभिनेत्यासोबतच प्रकाश राज, विजय देवरकोंडा राणा दगुबत्ती आणि लक्ष्मी मांच यांना समन्स जारी करण्यात आला होता. याशिवाय इडीने मागच्या महिन्यात गुगल आणि मेटाच्या अधिकाऱ्यांनाही सट्टेबाजी तपासात मदत मिळावी या कारणामुळे बोलावलं होतं.
माजी स्टार क्रिकेटपटू सुरेश रैनाने भारतीय क्रिकेटसाठी मोठे योगदान दिलेले आहे. तो सलामीवर व मधल्या फळीतील फलंदाज म्हणून त्याने आपली कारकिर्द गाजवलेली आहे. उपयुक्त फिरकी गोलंदाजीही तो करायचा. त्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर एकहाती सामने जिंकून दिलेले आहेत. टी-20 मध्ये शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ते आयपीएलमध्ये 5 हजार धावा रचणारा पहिला फलंदाज म्हणून त्याची गणना होते.