सावंतावाडीत भव्य फुटबॉल स्पर्धेचा शुभारंभ

संदीप गावडेंच आयोजन
Edited by: विनायक गांवस
Published on: August 15, 2023 18:49 PM
views 130  views

सावंतावाडी : भाजपचे युवा नेते, माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचा शुभारंभ माजी आमदार राजन तेली यांच्या उपस्थितीत करण्यात आला. येथील जिमखाना मैदानावर या भव्य दिव्य स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे.


याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्रिकेटच्या स्पर्धा मोठ्या प्रमाणात होतात. मात्र, संदीप गावडे यांनी राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करून जिल्ह्यात फुटबॉल खेळ रुजवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात क्रिकेटबरोबरच फुटबॉल खेळालाही आता चांगले दिवस येतील व त्यातूनच जिल्ह्यातील खेळाडू देश पातळीवर प्रतिनिधित्व करतील असा विश्वास माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केला. तर पहिल्याच वर्षी भरविण्यात आलेली ही राज्यस्तरीय स्पर्धा भव्य दिव्य झाली आहे अशा शब्दात त्यांनी संदीप गावडे यांचे कौतुक करीत स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.



यावेळी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखम सावंत-भोसले, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, माजी पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, हरिश्चंद्र पवार, दिलीप भालेकर, अॅड. अनिल निरवडेकर, चंद्रकांत जाधव, कृष्णा सावंत, अर्जुन परब, गुरुनाथ कासले, भाऊ कोळंबेकर, दया परब, गौरेश कामत, प्रकाश दळवी, साधना शेट्ये, संजय शिरसाट, मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, अमेय तेंडोलकर आदी उपस्थित होते.


यावेळी क्रिकेटसह फुटबॉल खेळामध्ये जिल्ह्यातील मुलांना रस आहे. पण, केवळ शालेय स्तरांवर फुटबॉल स्पर्धा होता. त्यामुळे फुटबॉल रसिक खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या स्पर्धेच आयोजन केल्याच मत संदीप गावडे यांनी व्यक्त केले. जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी स्पर्धेला शुभेच्छा देताना म्हणाले, भाजपच्या या युवा नेत्याने जिल्ह्यातील पहिली डे-नाईट राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा भरवून येथील युवकांना एक नवी दिशा व आशा दाखवण्याचे काम केलं आहे. त्यांच्या या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे असे गौरवोदगार त्यांनी काढले. तर माजी नगराध्यक्ष संजू परब यांनीही संदीप गावडे यांच्या या आयोजनाचे कौतुक करत युवकांना एक वेगळे हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचा संदीप गावडे यांचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार काढले. भविष्यात याहीपेक्षा मोठ्या स्पर्धा तुम्ही भरवाव्यात अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. तर संदीप गावडे यांच्या या संकल्पनेच युवराज लखमराजे भोंसले यांनी कौतुक केले. अनेक खेळाडू या माध्यमातून पुढे येतील असं मत त्यांनी व्यक्त केल. राजन तेली यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून, तर संदीप गावडे यांनी नाणेफेक करत या स्पर्धेच्या सामन्यांना सुरूवात करण्यात आली. राजन तेली, संजू परब, संदीप गावडे यांना यावेळी फुटबॉलला किक मारण्याचा आनंद घेतला.या स्पर्धेला सायंकाळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत.