नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल तलवारबाजी स्पर्धेत जिल्ह्यात अव्वल

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 26, 2023 13:26 PM
views 273  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा फेन्सिंग असोसिएशन यांचा संयुक्त विद्यमाने  विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय शालेय फेन्सिंग ( तलवार बाजी ) क्रीडा स्पर्धेत नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलने घवघवीत यश मिळवले आहे.

या  स्पर्धेत 19 वर्षाखाली मुली मध्ये मेहविश मुल्ला - सेबर द्वितीय,ईपी - प्रथम जोया पटेल - सेबर तृतीय फोईल तृतीय क्रमांक मिळवला तर 14 वर्षाखालील मुलीमध्ये जिया तळगावकर - इपी प्रथम जान्हवी राणे - ईपी तृतीय राधिका कांबळी- फोईल प्रथम , सेबर तृतीय ,तनिष्का मुद्रस - फोईल 2 द्वितीय सेबर तृतीय ,14 वर्षे मुले -साहिल अडुळकर - फोईल द्वितीय , सेबर तृतीय भार्गव गुळेकर - सेबर द्वितीय ,तरेश तुरळकर - इपी प्रथम ,17 वर्षाखाली मुले -प्रथमेश अडुळकर - फोईल प्रथम क्रमांक मिळवला आहे या सर्व विद्यार्थ्यांचे विभागीय शालेय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेतील विद्यार्थ्यांसाठी  एकनाथ धनवटे, अमोल चौगुले, सुयोग राजपकर यांचे मार्गदर्शन लाभले.

सर्व विदयार्थ्यांचे आदर्श एज्युकेशन सोसायटी चे चेअरमन मनोज गुळेकर, कार्याध्यक्ष रघुवीर राणे, सचिव मोहन कावळे, सी.इ.ओ. नीता शुक्ला, समन्वयक पराग शंकरदास, खजिनदार परवेज पटेल, राजेंद्र भ्रम्हदंडे,मुख्याध्यापक कौस्तुभ देसाई, सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.